IMPIMP

सरकार स्थापनेवर भाजपच्या बड्या नेत्याचे विधान; ‘आता वरून कसा आदेश येतो ते पाहायचे’

by bali123
bjp mp narayan rane ncp chief sharad pawar and amit shahs meeting

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांनी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु होती. त्यावर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यातच या भेटीवरून भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक विधान केले.

‘Lockdown पर्याय होऊ शकत नाही’, भाजपनंतर राष्ट्रवादीचा लॉकडाऊनला विरोध; CM ठाकरेंची ‘कोंडी’?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याचदरम्यान त्यांना राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मला कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. त्यांनी एवढ्या रात्री पवारांची भेट का घेतली माहिती नाही. त्यामुळे अमित शहा व अध्यक्षांची भूमिका मान्य असेल, असे त्यांनी म्हटले होते.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक : राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर

त्यानंतर आता नारायण राणे यांना राज्यात सत्तापरिवर्तन होणार का? अमित शहा-शरद पवार sharad pawar यांच्या भेटीचा नेमका अर्थ काय? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर राणे म्हणाले, वरून कसा आदेश येतो ते आता बघायचे. वरून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करायची आहे, असे ते म्हणाले.

अनिल देशमुख म्हणजे राष्ट्रवादी नाही
मुंबई पोलिस दलाच्या आयुक्तपदावरून दूर केल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘अनिल देशमुख म्हणजे राष्ट्रवादी नाही. त्यांच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकते. अनेक मार्ग निघू शकतील’.

Also Read

‘पोलिस दलात पैसे खात नाही असा कर्मचारी, अधिकारी नाही’, जाणून घ्या नेमकं काय म्हणाल्या माजी DG मीरा बोरवणकर

 

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

 

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

 

शिवसेना खासदाराचा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोचक सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे, आरोपांचे रंग उधळू नका’


शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

 

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

 

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

 

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

Related Posts