IMPIMP

दिलीप वळसे-पाटील होऊ शकतात नवे गृहमंत्री ! HM अनिल देशमुख यांना दिला जाऊ शकतो ‘निरोप’

by bali123
Dilip Walse-Patil can be the new Home Minister! Home Minister Anil Deshmukh may be removed from cabinet

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर खंडणीचा आरोप केला. परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर विरोधी पक्षाने गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारसमोर अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरुन हटवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शरद पवारांचा दिल्लीतून भाजपवर ‘निशाणा’, फडणवीसांनी केला ‘पलटवार’

परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केल्यानंतर अनिल देशमुख Anil Deshmukh यांचे गृहमंत्रीपद धोक्यात आले आहे. त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर त्यांच्या जागेवर दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागू शकते. दिलीप वळसे-पाटील हे सध्या ठाकरे सरकारमध्ये लेबर आणि एक्साईज मिनिस्टर आहेत. म्हणजे वळसे पाटील हे महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री असू शकतात.

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी ठाकरे सरकावर हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांचा गृहमंत्री पदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत त्यांचा राजीनामा येत नाही तोपर्यंत भाजप आंदोलन थांबवणार नसल्याचे स्पष्ट केले. एवढे गंभीर आरोप होऊ देखील उद्धव ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले सरकार वाचवायचे असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शरद पवारांनी ‘लेटर बॉम्ब’च्या ‘त्या’ कनेक्शन कडे वेधले लक्ष, म्हणाले…

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात भाष्य केले. सर्वांसोबत चर्चा करुन अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेतला जाईल. तसेच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचे स्पष्ट करुन येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अनिल देशमुख यांची गृहमंत्री पदावरुन गच्छती झाली तर गृहमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील आणि दत्तात्रय भरणे यांची नावे चर्चेत आहे. मात्र, दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद सोपवले जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. त्या संदर्भात दिल्लीत खलबतं सुरु देखील झाली आहेत.

हेही वाचा

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

Sanjay Raut : ‘पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का ?’

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंहांच्या ‘त्या’ पत्रामुळे भाजप आक्रमक, गृहमंत्र्यांचा राजीनामा?

बारामतीत भाजपाने जाळला गृहमंत्र्यांचा पुतळा

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

Related Posts