IMPIMP

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

by bali123
Nana Patole | get congress leader nana patoles tongue cut 1 lakh reward bjp leaders open threat at jalana

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – केंद्रातील भाजप सरकारनं लादलेल्या तीन कृषी कायद्यानं देशभरातील शेतकरी आणि शेती उध्वस्त होणार आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधत आहे. तर दुसरीकडं पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस यांच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. या महागाईनं सामान्य माणसाचं जगणं कठीण झालं आहेच. परंतु नोकरदार व मध्यमवर्गीयांचंही कंबरडं मोडलं आहे. देशात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. या झोपी गेलेल्या सरकारला जागं करण्यासाठी शेतकरी संघटनांनी 26 मार्च रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला काँग्रेस पक्ष (Indian National Congress) सक्रिय पाठींबा देत राज्यभर आंदोलन करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी दिली आहे.

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

26 मार्च रोजी शेतकरी संघटनांच्या बंदला पाठींबा देत काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपोषण
26 मार्च रोजी शेतकरी संघटनांच्या बंदला पाठींबा देत काँग्रेस पक्षाच्या वतीनं सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत राज्य, विभाग, जिल्हा व तालुका मुख्यालयात उपोषण करण्यात येणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, ज्येष्ठ काँग्रेस नेते व मंत्र्यांसह मी ( Nana Patole ) मुंबईत उपोषणाला बसणार आहे असं पटोले यांनी म्हटलं आहे.

Prakash Ambedkar : ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; पण…’

कार्याध्यक्ष हे विभागाच्या मुख्यालयी उपोषणाला बसणार आहेत. यात नागपूर येथे चंद्रकांत हांडोरे, अमरावतीत कुणाल पाटील, औरंगाबाद येथे शिवाजीराव मोघे, पुणे येथे बसवराज पाटील, नाशिकमध्ये आ. प्रणिती शिंदे तर ठाण्यात नसिम खान पदाधिकारी वर कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसणार आहेत.

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

‘परंतु हिटलरशाही वृत्तीचे मोदी सरकार या बाबींवर बोलायला तयार नाही’
नाना पटेले म्हणतात, काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील 100 दिवसांपेक्षा जास्त दिवस ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त शेतकरी शहिद झाले. मोदी सरकारनं सुरुवातीला चर्चेचा देखावा केला. परंतु तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मात्र मान्य केली नाही. कृषी कायद्यातील बदलांमुळं रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळं गोरगरीब जनता व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे. परंतु हिटलरशाही वृत्तीचे मोदी सरकार या बाबींवर बोलायला तयार नाही.

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

‘कामगार कायद्यातील बदलांमुळं कामगार देशोधडीला लागणार’
नाना पटोले पुढं म्हणाले, दुसरीकडे इंधनांवर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल 100 रुपये लिटर तर गॅस सिलेंडर 850 रुपयांवर गेला आहे. महागाईनं लोकांचं जगणं कठीण झालं आहे. कामगार कायद्यातील बदलांमुळं कामगार देशोधडीला लागणार आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Life Without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवाय देखील जगू शकतो मनुष्य, शरीराचे ‘हे’ गुपितं करतील तुम्हाला हैराण, जाणून घ्या

 

Related Posts