IMPIMP

Nitesh Rane | ‘…तो वाघ नसतो, त्याला पालतू कुत्रा म्हणतात’, वडेट्टीवारांच्या विधानावरुन राणेंचा शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा

by bali123
Nitesh Rane | andheri by election bjp mla nitesh rane attacks shivsena uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनNitesh Rane | वाघ आमच्या इशाऱ्याने चालतो, असे म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Congress leader Vijay Vadettiwar) यांनी लोणावळ्यात (Lonavala) पार पडलेल्या ओबीसी (OBC) चिंतन बैठकीत शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला होता. विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्या विधानावरुन भाजपचे नेते नितेश राणे (BJP leader Nitesh Rane) यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

‘…तो वाघ नसतो, त्याला पालतू कुत्रा म्हणतात’

नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट करत म्हटले की, मंत्री महोदय म्हणतात, आमच्या इशाऱ्यावर वाघ (Tiger) चालतो. इशाऱ्यावर चालणारा वाघ एकतर सर्कसमध्ये (Circus) असतो. नाहीतर तो वाघच नसतो. त्याला पालतू कुत्रा (Pet Dog) म्हणतात, असं नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हटलं आहे. तसेच बाकी समझदारोंको इशारा काफी है, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते वडेट्टीवार ?

ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्यावरुन लोणावळा ((Lonavala) येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची (OBC leaders) परिषद (Council) भरवण्यात आली होती. यामध्ये बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मी अशा भागात राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही. या मंचावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी एक वाघ नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडेही पाठवा असं सांगितले. त्यावर विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला होता.

Web Titel : nitesh rane has indirectly criticized shiv sena said

Related Posts