IMPIMP

… म्हणून संपूर्ण लॉकडाऊन करायला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध

by bali123
maharashtra political crisis police transfer posting money devendra fadnavis uddhav government

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी मात्र संपूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. या लॉकडाऊनला सगळेच वैतागले आहेत त्यामुळे गरिबांचे खूप नुकसान होत आहे. त्यामुळे जर गरज भासली तर कठोर लॉकडाऊन करण्याऐवजी कडक निर्बंध लावा. तसेच लसीकरणाची गती वाढवली पाहिजे असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस devendra fadnavis हे नागपुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कठोर लॉकडाऊनविषयी नापसंती दर्शवली आहे.

जयंत पाटील यांना मिळणार गृहमंत्रिपद?, चर्चांना उधाण

काय म्हणले देवेंद्र फडणवीस
‘सातत्याने लॉकडाऊन होत असल्याने सामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे आता संपूर्ण लॉकडाऊनपेक्षा निर्बंधयुक्त लॉकडाऊन केला पाहिजे. तसेच आता लसीकरण उपलब्ध असल्याने त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. नागपुरात केवळ ८८ केंद्रांतून सध्या लस दिली जात आहेत, तर ग्रामीण भागात ७९ केेंद्रातून दिली जात आहे. एकट्या नागपूर शहरात प्रत्येक वॉर्डात एक याप्रमाणे किमान १५१ लसीकरण केंद्रांची आवश्यकता आहे. ६० वर्षांहून अधिक आणि सहव्याधी असलेले ४५ वर्षांपेक्षा अधिक हा वयोगट लक्षात घेतला तरी नागपुरात ६,८७,००० जणांचे लसीकरण एप्रिलपूर्वी होणे आवश्यक आहे. आज दिवसाला केवळ ८ ते १० हजार लसीकरण होत आहे. त्यामुळे उद्दिष्ट गाठायचे असेल तर ४० हजार लसीकरण प्रतिदिवशी होणे आवश्यक आहे. काही सामाजिक संघटनांच्या मदतीने ठिकठिकाणी लसीकरण केंद्र उघडता आले तर त्यामुळे मोठी मदत होऊ शकेल आणि लक्ष्य लवकर गाठता येईल,’ असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

‘या’ 6 घरगुती उपायांमुळे कायमच्या नाहीशा होतील सुरकुत्या, जाणून घ्या

कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने पूर्वीप्रमाणेच कोविड खाटांची आणि कोविड रुग्णालयांची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे. काही वेळा लक्षणे नसलेले व्यक्ती रुग्णालयात दाखल होतात आणि त्यामुळे लक्षणे असलेल्या व्यक्तींना खाट उपलब्ध होत नाहीत. यामुळे नागपुरात मृत्यूच्या संख्यांमध्ये सुद्धा वाढ झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे रुग्णालय व्यवस्थापनावर येणार्‍या काळात कटाक्ष असला पाहिजे. तसेच रुग्णांची लूट होणार नाही, यासाठी पुन्हा पूर्वीची ऑडिट यंत्रणा उभारावी लागेल. मेडिकल आणि मेयोत सारख्या काही असुविधा आहेत. उच्च न्यायालयाने त्या लक्षात आणून दिल्या आहेत. या ठिकाणी गरीब लोक मोठ्या प्रमाणात जात असल्याने तिकडे पण लक्ष दिले गेले पाहिजे. नागपूर शहरात स्मार्ट सिटीचे काम करताना आपण ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारली आहे. त्या सीसीटीव्ही यंत्रणेची मदत घेऊन विलगीकरणाचा नियम मोडणार्‍यांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरणात दाखल करण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली पाहिजे. मागच्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी मंगल कार्यालये किंवा हॉल्स बुक केले होते. आता ते पैसे परत द्यायला तयार नाही आहेत त्यामुळे सामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही, त्याबाबतीत काहीतरी एसओपी तयार केला पाहिजे अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांच्याकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

Birthday SPL : अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं? समोर आलं थक्क करणारं कारण

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘या’ आमदाराची संपत्ती 5 वर्षांत वाढली चक्क 1985 टक्क्यांनी !

Related Posts