IMPIMP

Chandrakant Patil : ‘संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशाहीवर भाष्य करु शकतात’

by bali123
sanjay raut can comment moon sun anything mars chandrakant patil shiv sena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या घडामोडी आणि राजकारणावर शिवसेनेच नेते आणि खासदार संजय राऊत sanjay raut हे परखड मत व्यक्त करताना दिसत आहे. त्यांनी युपीए अध्यक्षपदावरुन नुकतेच वक्तव्य केले होते. यावरुन काँग्रेसमध्ये नाराजी वाढत आहे. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आले असता त्यांनी संजय राऊतांची sanjay raut खिल्ली उडवत टोला लगावला.

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा अर्ज भरण्यासाठी चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करत आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी होईल असा दावा केला आहे.

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

संजय राऊत sanjay raut यांनी शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावे, असे वक्तव्य केले होते. यावर काँग्रसमध्ये नाराजी असून नेत्यांनी यावर प्रतिक्रिया येत आहेत. या संदर्भात चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला.

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत हे मागील वर्षभरात असे नेते निर्माण झाले आहेत की, ते चंद्रावर, सूर्यावर आणि मंगळावर कशाहीवर भाष्य करु शकतात, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला. मी सामान्य नागरिक आहे, त्यांनी काय म्हटलं यावर मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

ठाकरे सरकारने विचार करावा
नांदेडमधील हल्ल्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, नांदेडमधील हल्ल्याचं समर्थन होणार नाही, पोलिसांवरील हल्ल्याचं तर कधीच नाही, आम्ही सत्तेत असो किंवा नसो. पण, हा असंतोष तेथील नागरिकांमध्ये का निर्माण झाला याचा विचार ठाकरे सरकारन करावा, असेही पाटील म्हणाले.

राज्यात Lockdown लागणार का ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले ‘हे’ संकेत

ही निवडणूक आम्हीच जिंकणार
चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक मुद्यावर बोलताना सांगितले की, स्थानिक शेतकऱ्यांचा प्रश्न हा मोठा विषय आहे. राज्यात 70 लाख लोकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली आहे. त्यापैकी, लाखो लोक सोलापूर जिल्ह्यातील आणि हजारो शेतकरी या पंढरपूर-माढा मतदारसंघातील आहेत. पाणी असले तरी वीज नसल्याने शेतकऱ्यांना पाणी वापरता येत नाही. तसेच वीज वाढीचा असंतोष नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे ही निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवली जाणार आहे. लोकांच्या मनातील उद्रेक मतांच्या रुपाने बाहेर पडणार आहे, आणि ही निवडणूक आम्हीच जिंकणार, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

 

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

 

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts