IMPIMP

Amit Saha : ‘PM मोदींनी 115 योजना आणल्या तर ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले’

by bali123
Mumbai Drugs Cases | nawab malik has objected to the handing over of drug cases under the Maharashtra government to the center after amit shah order

कोलकाता : वृत्तसंस्था – देशाचे लक्ष्य लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीत भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशीच सरळ लढत होत आहे. ममता बॅनर्जी यांच्या हातून सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने मोर्चे बांधणी केली आहे. तर सत्ता स्वत:कडे ठेवण्यासाठी ममता बॅनर्जी व्हिल चेअरवरुन सभांना उपस्थित राहून मतदारांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजपचे अनेक मंत्री पश्चिम बंगालमध्ये रॅली काढून भाजपला मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहे.

Jitendra Awhad : ‘रश्मी शुक्लांचे अपक्ष आमदारांना भाजपच्या गळाला लावण्याचे प्रयत्न’

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा amit shah यांनी राज्यातील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. बंगालच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 115 योजना आणल्या. तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये 115 घोटाळे झाले असे म्हणत अमित शहा amit shah यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. पुरुलिया जिल्ह्यात आयोजित रॅलीत अमित शहा बोलत होते.

यावेळी बोलताना अमित शहा amit shah म्हणाले, ममता दिदी तुम्हाला फ्लोराइडयुक्त पाणी देते. एकदा तुम्ही दीदीला सत्तेबाहेर घालवा, त्यानंतर भाजप तुम्हाल 10 हजार कोटी रुपये खर्च करुन शुद्ध पिण्याचे पाणी देईल, असे आश्वासन अमित शहा यांनी यावेळी दिले. तसेच कम्युनिष्टांनी येथे उद्योग सुरु होऊ दिले नाहीत. यानंतर दीदींनी उद्योगांनाही बाहेर ठेवले. तृणमूल असो किंवा कम्युनिस्ट कोणीही रोजगार देऊ शकणार नाही. तुम्हाला रोजगार पाहिजे असेल तर एनडीए सरकारला मतदान करा, असे आवाहन अमित शहा यांनी केले.

‘मी स्वत:च चौकशीची मागणी करतो, कौर प्रकरणात शिवसेनेच्या खासदाराची लोकसभेत मागणी’ (व्हिडीओ)

18 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार
रॅलीला संबोधित करताना अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांबाबत सांगितले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याच्या विकासासाठी 115 योजना आणल्या. मात्र, त्यांना राज्यात राबविण्यात आल्या नाहीत. याच दरम्यान ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले. राज्यात भाजपचे सरकार आले तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 हजार रुपये पाठवले जातील, अशी घोषणा अमित शहा यांनी केली.

बदल्यांचे रॅकेट, फोन टॅपिंगवर अजित पवार म्हणाले, ‘त्या बदल्या…’

महिलांना 33 टक्के आरक्षण
राज्यातील आदिवासी महिलांच्या हिताबद्दल भाष्य करताना अमित शहा म्हणाले, आदिवासींच्या हितासाठी आम्ही एक बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील महिलांसाठी 33 टक्के आरक्षण दिले जाईल. तसेच राज्यभर महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यात येणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

Also Read :

सरकारी कर्मचार्‍यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

 

सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट !

‘कोरोना’चा कहर ! सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या देशातील टॉप 10 शहरांमध्ये 9 शहरे महाराष्ट्रात

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

‘…तसे झाले तर अनिल देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल’; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

West Bengal Election 2021 : PM नरेंद्र मोदींनी ‘त्या’ भाजप कार्यकर्त्याचे पायच धरले !, पहा व्हिडीओ

Related Posts