IMPIMP

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला ‘कोरोना’चा संसर्ग !

by bali123
congress leader sachin sawant infected corona

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील सर्वाधिक रुग्णसंख्या एकट्या महाराष्ट्रात आहे. आत्तापर्यंत अनेक राजकीय नेतेमंडळींना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोना corona व्हायरसची लागण झाली आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

भाजप अन् राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा Lockdown ला विरोध? नेते म्हणाले – ‘पुन्हा लॉकडाऊन करुन लोकांना त्रास देऊ नका’

 

राज्यात वाढत असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंतेची बाब बनत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे अशा सूचना वेळोवेळी दिल्या जात आहेत. मात्र, तरीही नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच आता सचिन सावंत यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे, की मास्क घाला. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या’.

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

दरम्यान, आत्तापर्यंत अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाचा corona संसर्ग झाला आहे. त्यामध्ये शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांच्या पत्नी यांनाही कोरोनाची नुकतीच लागण झाली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आता सावंत यांना कोरोनाचा corona संसर्ग झाला आहे.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

 

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

 

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

 

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

 

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

 

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

 

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

 

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts