IMPIMP

Gold-Silver Rate Today : ‘सोन्या-चांदी’च्या दरात घसरण ! जाणून घ्या आजचे दर

by sikandershaikh
gold and silver price increased today while 11500 down from record highs check mcx rates

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासोन्या-चांदीच्या दरात (gold silver price) आज घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 140 रुपयांची घट झाल्याचं दिसून आलं. आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 46236 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. तर चांदी देखील 68000 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करताना दिसली. मागच्या सत्रात चांदी 68494 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

कालही सोन्या चांदीच्या दरात (gold silver price) घसरण झाली. गुरुवारी (दि 18 फेब्रुवारी) सराफा बाजारात सोनं 717 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर एमसीएक्सवर सकाळी11.30 वाजता एमसीएक्सवर सोन्याचा वायदा भाव 176 रुपयांनी वाढलेला दिसून आला. तर चांदीच्या वायदा भावात 88 रुपयांची वाढ नोंदवली गेली होती. काल सोन्याचा भाव 176 रुपयांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 46379 रुपयांच्या भावावर ट्रेंड करताना दिसला. एक किलो चांदीची किंमत ही 69183 एवढी होती.

सोनं प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 63000 रुपये होणयाची शक्यता आहे असं मत काही अर्थतज्ज्ञांनी वर्तवलं आहे. आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी गेल्या काही दिवसांपासून व्याजदर कमी केले होते. याशिवाय व्यावसायांना पाठींबा देण्यासाठी मोदी सरकारकडून पॅकेजही जाहीर करण्यात आले आहेत.

लग्न करण्यासाठी घरातून पळाल्या दोन मैत्रीणी, एक पोहचली तरुंगात अन्…

Related Posts