IMPIMP

‘देवेंद्र फडणवीसांनी केवळ पोलिसांची खाती नव्हे, तर SRA मधील विकासकांनाही दिली होती नोटीस’ : भाई जगताप

by bali123
bhai jagtap allegation devendra fadnavis had issued notices to the police sra developers and imposed fine of rs 5 lakh a day

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बायकोच्या बँकेत पोलिसांची खाती कशाच्या आधारावर वर्ग केली होती असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी केला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मात्र भाई यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिलं. यानंतर पुन्हा दोघांमध्ये टीका होताना दिसली. भाई जगताप यांनी पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांच्या एका ट्विटला उत्तर दिलं आहे.

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

‘फडणवीसांनी अशा प्रकारचे आदेश कशाच्या आधारावर दिले होते याचं उत्तर द्यावं’
भाई जगताप Bhai Jagtap म्हणाले, देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना त्यांनी केवळ पोलिसांचीच खाती अ‍ॅक्सिस बँकेत वर्ग केली होती, असं नाही तर त्यांनी एसआरए प्रकल्पातील विकासकांची देखील खाती वरळी येथील अ‍ॅक्सिस बँके वर्ग करण्याचे आदेश दिले होते. 15 फेब्रुवारी 2016 रोजी हे आदेश काढण्यात आले होते. जर ही खाती विकासकांनी वर्ग केली नाहीत, तर त्यांना 15 फेब्रुवारी 2016 ते 28 फेब्रुवारी 2016 च्या दरम्यान दिवसाला 1 लाख रुपये दंड आणि त्यानंतर असं न झाल्यास दिवसाला प्रत्येकी 5 लाख रुपये दंड असा आदेश दिला होता. फडणवीसांनी अशा प्रकारचे आदेश कशाच्या आधारावर दिले होते याचं उत्तर द्यावं अशी मागणीही भाई जगताप यांनी केली आहे.

प्रसिद्ध कृष्णा म्हणाला – ‘मला भागीदारी तोडणारा गोलंदाज व्हायचे आहे’

‘केवळ अ‍ॅक्सिस बँक का ? इतर बँका का नाहीत ? खाती कशाच्या आधारावर वर्ग केली ?
पुढं बोलताना भाई जगताप Bhai Jagtap म्हणाले, आणखी एक महत्त्वाची बाब अशी की, अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे की, अ‍ॅक्सिस बँकेचे खाते वर्ग करण्याचे आदेश हे आघाडी सरकारच्या काळात देण्यात आले होते. तर माझं त्यांना असं सांगणं आहे की, हे खरं आहे की, 2005 साली आघाडी सरकार असताना 16 बँकांमध्ये पोलिसांची खाती वर्ग करण्यासंदर्भात निर्णय झाला होता. परंतु निर्णय आमच्या काळात झाला. मात्र त्याची अंमलबजावणी ही 2016 साली झाली. ज्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं. धक्कादायक बाब अशी की, आम्ही ज्यावेळी निर्णय केला होता, त्यावेळी 16 बँकांचे पर्याय दिले होते. 2016 साली जो निर्णय झाला आणि निर्णयाची अंमलबजावणी झाली त्यावेळी 16 बँकांचा पर्याय नव्हता. त्यावेळी केवळ अ‍ॅक्सिस बँकेत खाती वर्ग करण्यात आली होती. माझा सवाल तोच आहे केवळ अ‍ॅक्सिस बँक का ? इतर बँका का नाहीत ? दुसरा सवाल असा की, खाती कशाच्या आधारावर वर्ग केली ? असंही भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

‘घोटाळ्यांमध्ये तेव्हा जे दलाल होते ते आता भाजपचे आमदार, राज्यात आरएसएसचा वाटा किती ?’
भाई जगताप असंही म्हणाले, आज नाना पटोले (Nana Patole) यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात मागणी केली की फडणवीस सरकार असताना राज्यात आरएसएसच्या लोकांना किती वाटा मिळायचा याची चौकशी व्हायला हवी. यासाठी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेणार आहेत आणि चौकशीची मागणी करणार आहेत. माझा या मागणीला पूर्ण पाठींबा आहे. कारण फडणवीसांच्या काळात जे काही घोटाळे झाले त्या घोटाळेबाजांना देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चीट दिली होती. त्यावेळी झालेला चिक्की घोटाळा, सिडको घोटाळा यात 2700 कोटींची जमीन ही केवळ 3 कोटींना विकण्यात आली होती. या व्यवहारात जे दलाल होते ते आता भाजपचे आमदार आहेत. याची चौकशी ते करणार आहेत का ? यात आरएसएसला किती वाटा देण्यात आला होता हेही समोर यायला हवं अशी मागणी त्यांनी केली.

‘राज्यपालपदाचं पावित्र्य हे सध्याच्या राज्यपालांनी घालवलं आहे, किंबहुना कलंकित केलंय’
भाई जगताप म्हणतात, आज भाजपनं राज्यपालांची भेट घेतली हे माध्यमांमधून पाहिलं. राजभवन हे सध्या भाजपचा अड्डा झाला आहे. त्यामुळं राज्यपालपदाचं पावित्र्य हे सध्याच्या राज्यपालांनी घालवलं आहे, किंबहुना कलंकित केलं आहे असं मला वाटतं अशी टीका देखील यावेळी बोलताना जगताप यांनी केली.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts