IMPIMP

हसन मुश्रीफ यांची चंद्रकांत पाटलांवर टीका, म्हणाले -‘चंद्रकांतदादा पाटलांना इतकी मस्ती कुठून आली’

by bali123
minister hasan mushrif allagation on bjp leader chandrakant patil in kolhapur

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये सुरु असलेले शाब्दीक वॉक थांबवण्याचे नाव घेत नाही. आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ hasan mushrif यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. चंद्रकांतदादा पाटलांना इतकी मस्ती कुठून आली, अशा शब्दात एकेरी भाषेत उल्लेख करत मुश्रीफ hasan mushrif यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. मुश्रीफ म्हणाले, मी फक्त मीडिया सेल प्रमुख नवीन कुमार जिंदालने केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपने माफी मागावी अशी मागणी केली होती.

‘प्लेगच्या साथीचे उदाहरण देत मनसेचा ठाकरे सरकारवर निशाणा, केली ‘रँड’च्या राजवटीशी तुलना’

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना हसन मुश्रीफ hasan mushrif यांनी चंद्रकांत पाटलांवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, चंद्रकांत पाटलांची लायकी नाही, ते भित्रे आहेत, कोल्हापूरातून पळून जावं लागलं, पुण्यात एका महिलेच्या जागेवर उभे रहावे लागले, यावरुन त्यांची लोकप्रियता समजते, असे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना मागील मंत्रिमंडळात दोन नंबरचे स्थान मिळाले होते. कोल्हापूरातून पळून जावं लागलेल्या व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारख्या प्रामाणिक व सोज्वळ व्यक्तीवर बोलणे योग्य नाही.

Post Office : 1 एप्रिलपासून बदलला पैसे काढण्याचा आणि जमा करण्याचा नियम

सरकार 25 वर्षे चालणार
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. राजकारण किती करायचे ? याला काही मर्यादा आहेत की नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सरकार पडण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यांनी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करु देत, काहीही आरोप करु देत हे सरकार 25 वर्षे चालणार आहे, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.

Raju Shetty : पंढरपूर पोटनिवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार, महाविकास आघाडीत बिघाडी?

लोककलावंतांना मदत करणार
कोरोनामुळे लोककलावंत घटकावर मोठा परिणाम झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून या घटकांना मदत करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे मुश्रीफ hasan mushrif यांनी सांगितले. तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन लोककलावंत घटकांना मदत करावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.

Also Read :

राहुल गांधींनी ‘या’ 2 शब्दांत साधला निवडणूक आयोगावर निशाणा

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 5 शहीद, 21 जण बेपत्ता

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास; मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

Related Posts