IMPIMP

ठाकरे सरकारचा किती दिवस हा ‘नन्नाचा पाढा’, आतातरी काही ‘हाल’चाल करा, भाजपने साधला निशाणा

by bali123
thackeray government should do something soon bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा दिवसेंदिवस संसर्ग वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत आहेत. राज्यात रुग्णवाढत असल्याने बेड कमी पडत आहेत. बेडसाठी रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तर, प्रशासन देखील हतबल झाल्याचे पहाला मिळत आहे. नाशिकमध्ये बेड मिळाला नसल्याने कोरोनाबाधित रुग्णाने महापालिकेसमोर आंदोलन केले. मात्र, वेळेत उपचार मिळाले नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या सर्व घडामोडींवरुन भाजपने bjp ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

‘प्लेगच्या साथीचे उदाहरण देत मनसेचा ठाकरे सरकारवर निशाणा, केली ‘रँड’च्या राजवटीशी तुलना’

महाराष्ट्र भाजपने bjp आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. राज्याच्या अनेक भागांमधून 4-5 तास प्रवास करुनही रुग्णांना बेड मिळणं अशक्य झालं आहे. रुग्णांचे होणारे हाल पाहून ठाकरे सरकारने आतातरी काही ‘हाल’चाल करावी, असे भाजपने म्हटले आहे.

व्यथा जिव्हारी लागू द्या…
तसेच, ठाकरे सरकारच्या हालगर्जीमुळे राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासेल अशी भीती व्यक्त केली जात होती. नाशिकमध्ये बाळासाहेब काळे या रुग्णाचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने पत्राद्वारे मांडलेली व्यथा तुमच्या जिव्हारी लागू दे,  असे देखील म्हटले आहे.

मुख्यमंत्री भाषण व सूचना देण्यात व्यग्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ भाषण आणि सूचना देण्यात व्यग्र आहेत. मात्र राज्यातील वैद्यकीय सुविधा वाढवण्याचा त्यांना विसर पडला आहे. अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्सेस, औषधे, बेड्स नाहीत. त्याबद्दल काही ठोस पावलं उचलण्याची तयारी ते करु शकले असते. पण त्यांनी ती केली नाही. ठकारे सरकार किती दिवस हा नन्नाचा पाढा ? असा सवाल भाजपने bjp विचारला आहे.

सरकार काय करत होते ?
याशिवाय, राज्यावर आधीच कोरोनाचं सावट आहे. त्यात आणखी एक संकट म्हणजे रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. 7 ते 8 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा राज्यात शिल्लक आहे. रक्ताचा तुटवडा होई पर्यंत ठाकरे सरकार काय करत होते ? याचे उत्तर त्यांनी द्यावे.

 

Also Read :

राहुल गांधींनी ‘या’ 2 शब्दांत साधला निवडणूक आयोगावर निशाणा

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक; 5 शहीद, 21 जण बेपत्ता

CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले

Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)

फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास; मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

Related Posts