IMPIMP

Fact Check : PM मोदींच्या मंत्र्याच्या भावालाच बेड मिळेना?, जाणून घ्या व्हायरल ट्विट मागचं नेमकं ‘सत्य’

by Team Deccan Express
fact check union minister vk singh ask bed twitter his corona positive brother ghaziabad

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या corona दुसऱ्या लाटेत हाहाकार पहायला मिळत आहे. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एक आठवड्यापूर्वी देशात 1 लाखापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र काल देशात रुग्णसंख्येने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे. देशात गेल्या 24 तासात तब्बल 2 लाख 61 हजार रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात अनेक ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याची माहीती समोर आली आहे. याच दरम्यान केंद्रीय मंत्र्यांचे एक ट्विट प्रचंड व्हायरल झाले असून, या ट्विटमध्ये त्यांनी आपल्या भावाला बेड मिळत नाही, मदत मिळावी असे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी आपल्या भावाला बेड मिळत नाही. त्यांना बेड मिळण्यासाठी मदत करावी, असे आवाहन आपल्या ट्विटर अकाउंटवरुन केले होते. तसेच त्यांनी गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना टॅग केलं होते. आमची मदत करा, माझ्या भावाला कोरोना corona संसर्ग झालेला असून त्याच्या उपचारासाठी बेडची आवश्यकता आहे. गाझियाबादमध्ये बेडची व्यवस्था होत नाही. कृपया तुम्ही लक्ष घाला असं आवाहन व्ही.के. सिंह यांनी केले होते. केंद्रीय मंत्र्यांच्या भावालाच बेड मिळत नसल्याचे हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले. यानंतर व्हि.के. सिंग यांनी यासंदर्भात स्पष्टकरण दिले आहे.

व्हि.के. सिंग यांनी ट्विटबाबत स्पष्टिकरण देताना सांगितले की, आपण ट्विटमध्ये भाऊ म्हणून उल्लेख केलेली व्यक्ती ही खऱ्या आयुष्यात आपली नातेवाईक नाही. तसेच हिंदीमध्ये असलेलं हे एक फॉरवर्ड ट्विट असल्याचे म्हटले आहे. रुग्णाला लवकर मदत मिळावी या दृष्टीने आपण ते फॉरवर्ड ट्विट आपल्या अकाउंटवरुनच ट्विट केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यानंतर यावर स्पष्टिकरण देणारे आणखी एक ट्विट त्यांनी केले आहे. यामध्ये तो माझा रक्ताने भाऊ नाही. पण आमच्यात माणुसकीचं नात आहे. रुग्णांपर्यंत लवकर मदत पोहचावी यासाठी ते ट्विट केले असल्याचे व्हि.के. सिंह यांनी आता म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Also Read :

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

 

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

 

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

 

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

 

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

Related Posts