IMPIMP

किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला, म्हणाल्या – ‘मास्क न घालणाऱ्या नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा मोठा प्रश्न’

by bali123
Kishori Pednekar | shivsena kishori pednekar mocks mns raj thackeray maharashtra politics

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर kishori pednekar यांनी मास्क न घालण्यावरून मनसे (Maharashtra Navnirman Sena – MNS) वर जोरदार टीका केली आहे. राज्यात कोरोना (COVID-19) चा कहर वाढताना दिसत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी देखील चिंता वाढवणारी आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज (शुक्रवार, दि 2 एप्रिल) पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली. राजकीय कार्यकर्ते आणि नेते देखील मास्क वापरण्याला गांभीर्यानं घेत नाहीत. या मुद्द्यावरून त्यांनी मनसेवर निशाणा साधत टीका केली.

राज्यात पुन्हा Lockdown की कठोर निर्बंध? CM उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 pm ला जनतेला संबोधित करणार


‘अशा लोकांवर 100 टक्के कारवाई केली जाईल’
किशोरी पेडणेकर kishori pednekar म्हणाल्या, कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्क वापरणं ही तर प्राथमिक गरज आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणं बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी गांभीर्यानं याकडे पाहिलं जात नसल्याचं दिसून येत आहे. अशा लोकांवर 100 टक्के कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्रात लॉकडाऊन? CM ठाकरेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

‘या जीवघेण्या रोगाबाबत आता नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा प्रश्न निर्माण झाला आहे’
मनसेच्या नेत्यांकडून मास्क घालणं टाळलं जातं. याबाबत सवाल केल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी यावरून सडकून टीका केली. पेडणेकर म्हणाल्या, राजकीय नेते जनतेचं प्रोबधन करत असतात. पण या जीवघेण्या रोगाबाबत आता नेत्यांचं प्रबोधन कुणी करावं हा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या जनतेच्या मतांच्या आधारावर आपण निवडून येतो त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि कार्यकर्त्याचं काम आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरून स्वत:च्या फायद्याचं राजकारण करणं चुकीचं आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

‘महाराष्ट्रातील लोकही भारतीयच हे विसरू नका’; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

‘निर्बंध झुगारणाऱ्यांनी राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या आरोग्याच्या काळजीचा विचारा करावा’
दरम्यान वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील धार्मिक स्थळं पुन्हा एकदा बंद करण्याचा विचार पालिका करत असताना भाजप नेत्यांकडून त्याला विरोध केला जात आहे. याबाबत किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, निर्बंध झुगारणाऱ्यांनी राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या आरोग्याच्या काळजीचा विचारा करावा. राज्याचे मुख्यमंत्री एका कुटुंबाप्रमाणे राज्याची काळजी घेत आहेत. लॉकडाऊन कुणालाच नको आहे. परंतु वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कठोर निर्णय घेणं गरजेचं होऊन बसलं आहे. भाजपवाल्यांनी रस्त्यावर उतरून काम करावं मग त्यांना लक्षात येईल.

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

‘काही दिवसात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू शकतात, यामुळं शहरात बेडची संख्या अपुरी पडू शकते’
मुंबईत काल 8 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस शहरात रुग्णांची संख्याही वाढत आहे. याबातही किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, सध्याची आकडेवारी पाहता येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढू शकतात. यामुळं शहरात बेडची संख्या अपुरी पडू शकते. त्यामुळं या गोष्टींबाबत महापालिका गांभीर्यानं विचार करत आहे. काही लोक अजूनही निष्काळजीपणा करताना दिसत आहेत. त्यामुळं कठोर निर्बंध लादणं गरजेचं झालं आहे.

Also Read:

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

 

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

 

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

 

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts