IMPIMP

Sachin Vaze Case : मिठी नदीत सापडलेल्या प्रिंटरमधून अंबानींना दिलेले धमकीचे पत्र प्रिंट केले?, इतर वस्तूंचा देखील झाला खुलासा

by bali123
the printer found in mithi river belongs to vinayak shinde and the dvr belongs to sachin waze society

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद झालेल्या मृत्यूचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत आहे. याप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे sachin waze याला अटक करण्यात आली आहे. एनआयएने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. सचिन वाझे याने मिठी नदीत काही पुरावे नष्ट करण्यासाठी टाकले होते. एनआयएने 28 मार्च रोजी दुपारी मिठी नदीत पुराव्यांचा शोध घेतला असता वाझे याने नदीत टाकलेले कॉम्प्युटरचे सीपीयू, हार्डडिस्क, खोट्या नंबर प्लेट्स अशा अनेक वस्तू सापडल्या आहेत. यावेळी सचिन वाझेला मुंबईतील मिठी नदी या ठिकाणी नेण्यात आले होते.

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

रविवारी (दि.28) मिठी नदीमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आले. साडे तीन तासाच्या सर्च ऑपरेशननंतर मिठी नदीमधून वाझेने sachin waze पुरावे नष्ट करण्यासाठी नदी पात्रात टाकलेले सर्व पुरावे काढण्यात आले. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे विनायक शिंदेंच्या घरात जो प्रिंटर होता. ज्यामधून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणारं पत्र प्रिंट करण्यात आलं होतं. तर सचिन वाझेच्या सोसायटीमधील डीवीआरदेखील एनआयएच्या हाती लागला आहे. एनआयएने वाझेंना सोबत घेऊन या परिसराची पाहणी केली.

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

मिठी नदीतून NIAच्या हाती काय लागलं ?
मिठी नदीत करण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये एनआयच्या हाती 2 नंबर प्लेट, 1 प्रिंटर, 1 लॅपटॉप, 1 USB वायर, 2 हार्ड डिस्क, कार्ट्रेज, मोबाईल कव्हर इत्यादी महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

डीव्हीआर वाझेंच्या सोसायटीतील
एनआयएला सर्च ऑपरेशनमध्ये सापडलेल्या वस्तूंमधील डीव्हीआर सचिन वाझेंच्या सोसायटीतील असण्याची शक्यता आहे. क्राईम इंटेलिजन्स युनिटकडे जेव्हा या प्रकरणाचा तपास होता. त्यावेळी सचिन वाझेचा sachin waze सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज काझी यांनी वाझेंच्या सोसायटीमधील डीव्हीआर आणि सीसीटीव्ही आपल्या ताब्यात घेतले होते.

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

पुराव्यांची रेकॉर्डवर नोंद नाही
क्राईम इंटेलिजिन्स युनिटकडे जेव्हा याचा तपास होता तेव्हा जे पुरावे युनिटला सापडले होते, ते त्याने रेकॉर्डवर घेतले नाहीत. एखाद्या केसचा तपास करत असताना एखाद्या व्यक्तीचा जबाब किंवा त्यासंदर्भात सापडलेले पुरावे यांची नोंद करणे गरजेचे असते. मात्र, या प्रकरणात वाझेने या पुराव्यांची नोंद केली नाही. त्यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ झाली.

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

धमकीचे पत्र प्रिंट केल्यानंतर प्रिंटर नदीत फेकला
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओमध्ये एक धमकीचे पत्र सापडलं होतं. यामध्ये अंबानी कुटुंबाला धमकी देण्यात आली होती. मिठी नदीत सापडलेल्या प्रिंटरमधून त्या पत्राची प्रिंट काढण्यात आली आणि तो प्रिंटर विनायक शिंदेचा असल्याचा संशय एनआयएला आहे. पत्र टाईप करुन झाल्यानंतर प्रिंटर आणि त्यासोबतचे इतर पुरावे नदीत फेकल्याचा एनआयएचा निष्कर्ष आहे.

राज्यात Lockdown लागणार का ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले ‘हे’ संकेत

नंबर प्लेट वॉल्वो गाडीचे
एनआयएला मिठी नदीमध्ये दोन नंबर प्लेट सापडल्या आहेत. या नंबर प्लेट वॉल्वो गाडीचे असण्याची शक्यता आहे. ही वॉल्वो गाडी दहशतवाद विरोधी पथकाने वापीमधून जप्त केली होती. या गाडीचा गुन्ह्यात कसा वापर करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

 

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

 

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

 

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

 

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts