IMPIMP

राज्यात कोरोनाबाधित रुग्णवाढीचा वेग वाढला; गेल्या 24 तासांत 31,855 नवे रुग्ण, 95 जणांचा मृत्यू

by bali123
maharashtra state corona virus update

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – देशात कोरोना Corona व्हायरसचा उद्रेक कायम असून, महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या 24 तासांत 31,855 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 15,098 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, यामध्ये 95 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आत्तापर्यंत 25,64,881 जणांना कोरोना Corona व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 22,62,593 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर सध्या कोरोनाचे  2,47,299 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र, आत्तापर्यंत 53,684 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील बरे होण्याचा रुग्णदर (रिकव्हरी रेट) 88.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय राज्यात सध्या 12,68,094 रुग्ण होम क्वारंटाईन असून, 13,499 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

पुणे, मुंबईत सर्वाधिक रुग्ण
पुण्यात आत्तापर्यंत 4,87,966 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 4,30,656 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 8225 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 49,036 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत आत्तापर्यंत 3,74,641 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये 3,32,713 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 11,610 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 29,395 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

ठाण्यातही रुग्णसंख्या वाढतीये
पुणे, मुंबईनंतर आता ठाण्यातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आत्तापर्यंत 3,14,280 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 2,83,768 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 5914 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ठाण्यात सध्या 24,567 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts