IMPIMP

खडसेंचा फडणवीसांवर घणाघात, म्हणाले – ‘मी सुद्धा विरोधी पक्षनेता होतो, पण संकटाच्या काळात असा कुत्र्या-मांजराचा खेळ कधी खेळला नाही’

by Team Deccan Express
Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis on eknath khadse meeting amit shah joing bjp

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोना रुग्णांवर उपयोगी पडणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा जाणवत आहे. यावरुन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे eknath khadse यांनी भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. केंद्र सरकारने वेळीच रेमडेसिविर इंजेक्शनची निर्यातबंदी केली असती तर आपल्याला साठा उपलब्ध झाला असता. मात्र, आपल्याकडे टंचाई असताना केंद्र सरकाने निर्यात सुरु ठेवली. यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप खडसे eknath khadse यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खडसे म्हणाले, विरोधी पक्षनेता म्हणूनही मी सुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्र्या-मांजराचा खेळ कधी खेळला नाही, असा टोला त्यांनी लगावला.

‘दिल्लीची हुजरेगिरी करुन महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री काय कामाचे ?’

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (रविवार) पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आणि केंद्राच्या भूमिकेवर भाष्य करताना जोरदार टोलेबाजी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

काँग्रेसच्या नेत्यानं विचारला फडणवीस अन् दरेकरांना सवाल, म्हणाले – ‘पोलीस एखाद्याला चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत का?’

केंद्राने वेळीच निर्यात बंदी का केली नाही ?
राज्यात नाहीतर संपूर्ण देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. केंद्र सरकारने वेळेवर रेडमेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली असती तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध झाला असता. केंद्राने वेळीच निर्यात बंदी का केली नाही ? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. आता निर्यात बंदी झाली असून आता लवकरच साठा उपलब्ध होईल असा विश्वास देखील खडसे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने अशा संकट काळात राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याची गरज असल्याचे सांगितले.

कुत्र्या-मांजराचा खेळ कधी खेळला नाही
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकनाथ खडसे म्हणाले, महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकट आले अथवा आकस्मिक संकटाचा प्रसंग ओढावला, मग तो किल्लीरीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट असोत, अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले. विरोधी पक्षनेता म्हणून मी सुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्र्या-मांजराचा खेळ कधी खेळला नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नसल्याची टीका खडसे eknath khadse यांनी केली.

Nawab Malik : फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर संपूर्ण भाजप का घाबरली? फडणवीसांनी वकीलपत्र घेतलं का?

मला वाटलं फडणवीस उत्तम भविष्यकार असतील, पण…
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सरकार पडणार असल्याचा दावा केला होता. यावरुन एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला. फडणवीस हे सातत्याने सरकार पडेल अशा वाल्गना करत आहे. आपले कार्यकर्ते टिकून रहावेत म्हणून फडणवीसांचा हा आटापिटा आहे. मला वाटलं फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. फडणवीसांनी यापूर्वी चार ते पाच वेळा सरकार पडणार असल्याचे सांगितले. आता त्यांनी पुन्हा दोन तारीख दिली आहे. मी दोन तारखेची वाट पहात असून जर दोन तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेन, असा टोला खडसेंनी eknath khadse लगावला.

Also Read :

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

 

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

 

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

 

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

 

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

Related Posts