IMPIMP

‘आर्किटेक्ट’ एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग, नागपुरात राष्ट्रवादीकडून आंदोलन

by bali123
ncp protest bjp devendra fadanvis architect eknath nimgade murder case

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्या प्रकरणात विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadanvis यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रावदीने केला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवार) सकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस devendra fadanvis यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वेदप्रकाश आर्य, वर्षा श्यामकुळे, महेंद्र भांगे, शैलेंद्र तिवारी यांच्यासह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांची रवानगी झिंगाबाई टाकळी येथील खुल्या कारागृहात करण्यात आली.

Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव

नागपूर शहरातील बहुचर्चीत एकनाथ नमगडे हत्या प्रकरणात नाव समोर आलेला कुख्यात गुंड रणजीत सफेलकर याचे भाजपच्या काही नेत्यांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. कोट्यावधी रुपयांच्या जमीन वादातून निमगडे यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली असल्याचा दावा पोलिसांनी नुकताच केला आहे. ही पडीक जमीन फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात आहे. या हत्येमागे फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग आहे. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यास सत्य समोर येईल, असा दावा वेदप्रकाश आर्य यांनी केला आहे.

महत्त्वाची बातमी : एप्रिलमध्ये केवळ 17 दिवस उघडणार बँका ! मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देखील राहणार सुट्ट्या, आताच उरकून घ्या महत्वाची कामे

कोण आहे रणजित सफेलकर ?
रणजित सफेलकर हा नगापूरमधील कुख्यात गुंड आहे. कामठी नगरपरिषदेमध्ये भाजपच्या तिकीटावर तो निवडून आला होता. त्यानंतर तो कामठीचा नगरउपाध्यक्ष होता. त्यामुळे त्याचे भाजप कनेक्शन असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

काय आहे प्रकरण ?
6 सप्टेंबर 2016 मध्ये लाल ईमली मार्गावर दुचाकीवरुन ट्रीपल सिट आलेल्या हल्लेखोरांनी एकनाथ निमगडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत होती. मात्र, दोन वर्षात या गुन्ह्यातील आरोपी सापडले नसल्याने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मागील दहा वर्षातील अनडिटेक्ट मर्डर फाईल्स उघडल्या. गुन्हे शाखेने निमगडे हत्याकांडातील आरोपींचा शोध सुरु केला. त्यावेळी छिंदवाडा जेलमधील राजा नावाच्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत पोलिसांना सुगावा लागला. तोच धागा पकडून गुन्हे शाखेने निमगडे हत्याकांडाचा छडा लावला. आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची वर्धा मार्गावर विमानतळाजवळ जवळपास 100 कोटींपेक्षा जास्त किमतीची साडेपाच एकर जागा आहे. याच जागेवरुन त्यांची 5 कोटी रुपयांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts