IMPIMP

मनसुख हिरेन प्रकरणी ATS च्या हाती महत्वाची माहिती, PI सुनील माने यांची चौकशी

by bali123
mansukh hiren important lead atss hands mansukh hiren case inquiry police officer sunil mane started

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र एटीएसकडून करण्यात येत आहे. एटीएसने आतापर्यंत अनेक जणांचे जबाब नोंदवले आहेत. कांदिवली क्राईम ब्रांच युनिटचे पोलीस निरीक्षक सुनील माने sunil mane यांना एटीएसकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये त्यांची चौकशी सुरु आहे.

गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा ! Home Minister पदासाठी राष्ट्रवादीतून समोर आलं वेगळंच नाव

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एटीएसच्या हाती काही महत्वाची माहिती लागली आहे. त्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी एटीएसकडून कोर्टात प्रयत्न करण्यात येणार आहे. जेव्हा मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून तावडे नावाच्या पोलिसाचा फोन आला होता त्यांनी मनसुख यांना चौकशीसाठी बोलावलं होतं, मग ते गेले ते घरी परत आलेच नाही. त्यामुळे कांदिवली क्राईम युनिटचे पोलीस निरीक्षक सुनील माने sunil mane यांची चौकशी करण्यात येत असावी.

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी असून ते देखील API आहेत. रियाझ काझी हे सचिन वाझे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या केलेल्या तपासात सहभागी होते. तसेच रियाझ काझी यांनी सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून गाड्यांच्या नंबरप्लेट तयार करुन आणल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही फूटेजसुद्धा रियाझ काझी यांनी आपल्या ताब्यात घेतले होते. यामुळे जर रियाझ काझी माफीचा साक्षीदार झाल्यास सचिन वाझे यांच्या कटाचा पर्दाफाश होण्यास मदत होईल.

नाना पटोलेंचा नितीन राऊत यांच्या ‘ऊर्जा’वर ‘डोळा’?

या तपासात NIA ने प्रथम अँटिलीयानजीक सापडलेली स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. त्यानंतर NIA ने सीपी कार्यालयातून सफेद इनोव्हा गाडी ताब्यात घेतली. या सगळ्यानंतर त्यांनी अजून एक मर्सिडीज जप्त करुन ती त्यांच्या कार्यालयात आणली आणि यानंतर अधिकाऱ्यांनी या गाडीची तपासणी केली. या सगळ्या घडामोडींनंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली. सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर हि काळया रंगाची मर्सिडीज ताब्यात घेण्यात आली. ती गाडी सीएसएमटी जवळच्या एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती. तसेच काल ठाण्यातून प्रॅडो कार जप्त करण्यात आली. त्यानंतर आता आणखी एक मर्सिडीज ताब्यात घेतल्याचे समजत आहे. यामधून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका

Health Benefits Of Banana Shake :आरोग्यासाठी केळी आणि दुधाचा ‘या’ पद्धतीनं करा वापर, याचे जबरदस्त फायदे करतील ‘हैराण’, जाणून घ्या

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?’ उर्मिला मातोंडकर यांची ‘त्या’ मुख्यमंत्र्यांवर टीका

आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘… पण काही जण वडिलोपार्जित संपत्ती वाढवण्याऐवजी ती विकून घरखर्च भागवतात’ – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार

Related Posts