IMPIMP

गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा ! Home Minister पदासाठी राष्ट्रवादीतून समोर आलं वेगळंच नाव

by bali123
NCP Chief Sharad Pawar | NCP Chief Sharad Pawar On Chandrakant Patil Statement Of CM Eknath Shinde

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Sharad Pawar | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणी आणि मनसुख हिरने मृत्यू प्रकरण (Mansukh Hiren Death Case) मुळं एनआयएने एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांची तडकाफडकी बदलीही करण्यात आली आहे. परंतु यावर सर्व घडामोडी थांबलेल्या नाहीत. या प्रकरणी राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापताना दिसत आहे. कारण आता थेट गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा सुरू आहे.

नाना पटोलेंचा नितीन राऊत यांच्या ‘ऊर्जा’वर ‘डोळा’?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यात नवी दिल्ली येथे महत्त्वाची बैठक पार पडली. 2 तास ही बैठक चालली होती. या बैठकीत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांकडून मुंबईतील घडमोडींबाबत सविस्तर माहिती घेतली. तसंच पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कारभाराबाबत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारला अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

शरद पवार पुन्हा एकदा आपल्या धक्कातंत्राचा वापर करणार

शरद पवार Sharad Pawar सचिन वाझे प्रकरणामुळं अनिल देशमुख यांच्यावर नाराज आहेत अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळं राष्ट्रवादीकडून गृहमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. इतकंच नाही तर यासाठी आता शरद पवार पुन्हा एकदा आपल्या धक्कातंत्राचा वापर करणार आहे अशी माहिती समजत आहे.

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

राष्ट्रवादीकडून गृहमंत्रिपदासाठी नव्या नेत्याच्या नावाची चर्चा

अनिल देशमुख यांच्याकडून गृह खात्याचा कारभार काढून घेण्यात आला तर या पदासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांची नावे स्पर्धेत आहेत असं बोललं जात होतं. आता मात्र या पदासाठी राष्ट्रवादीकडून राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या नावाचा विचार केला जात आहे अशी माहिती आहे.

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’

गृह खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी राजेश टोपे यांच्याकडे दिली जावी
राजेश टोपे यांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे सध्या आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी आहे. आरोग्यमंत्री म्हणून टोपे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचं राज्यभरातून कौतुक होताना दिसलं. त्यामुळ राष्ट्रवादीचं नेतृत्व विचार करत आहेत की, गृह खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी ही राजेश टोपे यांच्याकडे दिली जावी. यासाठी शरद पवारांनी राजेश टोपेंना दिल्लीत बोलवून घेतल्याचंही बोललं जात आहे. याबाबत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

हेही वाचा

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका

Health Benefits Of Banana Shake :आरोग्यासाठी केळी आणि दुधाचा ‘या’ पद्धतीनं करा वापर, याचे जबरदस्त फायदे करतील ‘हैराण’, जाणून घ्या

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?’ उर्मिला मातोंडकर यांची ‘त्या’ मुख्यमंत्र्यांवर टीका

आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘… पण काही जण वडिलोपार्जित संपत्ती वाढवण्याऐवजी ती विकून घरखर्च भागवतात’ – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार

Related Posts