IMPIMP

पाकिस्तानचे PM इम्रान खान यांना कोरोना; दोन दिवसांपूर्वी घेतली होती ‘चीनी’ लस

by bali123
pak pm imran khan tested positive for covid 19 administered first dose chinese sinovac corona vaccine

इस्लामाबाद : जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिका, पाकिस्तान, भारतासह इतर देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यातच आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान imran khan यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली जात आहे. यातील विशेष बाब म्हणजे इम्रान खान यांनी दोनच दिवसांपूर्वी चीनची कोरोना लस घेतली होती.

जयंत पाटील यांना मिळणार गृहमंत्रिपद?, चर्चांना उधाण

पंतप्रधान खान यांच्या आरोग्य सेवेसंबंधित विशेष सहाय्यक फैजल सुल्तान यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. इम्रान खान imran khan यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ते सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी चीनची Sinovac आणि Sinopharm ही कोरोनावरील लस घेतली होती. ही लस घेऊनही त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इम्रान खान यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता त्यांच्या सर्व स्टाफ आणि त्यांना भेटण्यासाठी आलेल्या सर्वांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे, असे सांगितले जात आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी त्यांच्यामध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.

Photos : कंडोमची जाहिरात करणारी ‘ही’ पहिली अभिनेत्री ! बोल्ड विधानांमुळं आजही फेमस

दरम्यान, पाकिस्तानात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी 3,876 नवे कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. तर पाकिस्तानात आत्तापर्यंत 62 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये 13 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली जात आहे.

हेही वाचा

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

Birthday SPL : अलका याग्निक यांनी बॉलिवूड का सोडलं? समोर आलं थक्क करणारं कारण

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

Related Posts