IMPIMP

‘बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही” ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

by bali123
Maharashtra Political Crisis | shivsena leader eknath shinde revolt maharashtra political crisis the last mla had an offer but mns leader amey khopkar slams shivsena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे balasaheb thackeray यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम दादर येथील महापौर निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या आधीच वाद निर्माण झाला आहे.

ठाकरे स्मारकाच्या भूमीपूजनाला एकनाथ शिंदेंनाही डावललं? भाजप आमदारानं शेअर केली निमंत्रण पत्रिका !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या भूमिपूजनाचे आमंत्रण न दिल्यामुळे भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर मनसेनेसुद्धा मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “स्वर्गीय मा.बाळासाहेबांचे balasaheb thackeray विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही. अशी टीका संदीप देशपांडे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा करण्यात आली होती. तसेच या स्मारकासाठी अनेक परवानग्या देखील त्यांच्याच कार्यकाळात घेण्यात आला होत्या. तसेच फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती. या नंतर कागद हस्तांतरण कार्यक्रम पार पडला होता, मात्र आता या स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाचे आमंत्रण नसल्याचे समजत आहे.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन

बाळासाहेब ठाकरे balasaheb thackeray यांच्या स्मारकाचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. या स्मारकासाठी मुंबईच्या महापौराचं निवासस्थानसुद्धा ताब्यात घेण्यात आले होते. मात्र या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका पार पडतात पण स्मारक अजूनपर्यंत झाले नाही. शिवसेनेची सत्ता असूनसुद्धा स्मारकाचे काम अजून रखडले आहे. शिवसेनेला महापौर बंगला बळकवायचा होता अशी टीका सातत्याने मनसेकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ४०० कोटींचा निधी देण्यात आला असून आज स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे.

Pandharpur : राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूध्द बंडखोरी करणार्‍या शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्यावर CM ठाकरेंच्या आदेशाने कारवाई

बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजूस तर दुसऱ्या बाजूस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेले जुने महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होणार आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्रीमती आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला आहे. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणाची नियुक्ती करण्यात आली आहे. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तू उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याची माहिती सुभाष देसाई यांच्याकडून देण्यात आली आहे.

Also Read:

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले…

 

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

 

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

 

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

 

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना राज्यात ‘No Entry’ ! ठाकरे सरकार आणणार स्वतंत्र कायदा

 

…तर देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय पर्याय नाही; शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलेल्या नरेंद्र पाटलांचे वक्तव्य

 

Kerala election : भाजपने 5 वर्षांपूर्वी उघडलेले खाते ‘या’ वर्षी आम्ही बंद करणार; ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Related Posts