IMPIMP

दिल्लीच्या ‘लॉबी’कडे बोट दाखवत, शिवसेनेची परमबीर सिंह यांच्यावर ‘स्तुतीसुमने’

by bali123
shiv sena praises ips officer parambir singh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –राज्यात सचिन वाझे प्रकरणाला एक नवीन वळण लागलं तर राज्य सरकारकडून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह parambir singh यांची उचलबांगडी करण्यात आली. पण परमबीर सिंह parambir singh यांच्यावर शिवसेनेने स्तुतीसुमने उधळली. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही, असे म्हणत परमबीर सिंह यांच्या बदलीनंतरही शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या सामनामधून सिंह यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

नाना पटोलेंचा नितीन राऊत यांच्या ‘ऊर्जा’वर ‘डोळा’?

तर राज्यातील विरोधी पक्षावरही शिवसेनेने टीका केली आहे. ‘पोलिसांसारख्या संस्था राज्याचा कणा असतात. त्याची प्रतिष्ठा सगळ्यांनीच सांभाळायची असते. विरोधी पक्ष महाराष्ट्राशी इमान राखून असेल तर ते पोलिसांची प्रतिष्ठापणास लावून राजकारण करणार नाहीत. मनसुख प्रकरणामागचे पॉलिटिकल बॉस कोण, हा त्यांचा प्रश्न आहे. याचे उत्तर त्यांनीच शोधावं. परंतु अशा प्रकरणात कोणीच पॉलिटिकल बॉस नसतो. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. मनसुखची हत्या झाली असेल तर गुन्हेगार सुटणार नाहीत. त्यानं आत्महत्या केली असेल तर त्यामागच्या कारणांचा शोध घेतला जाईल व त्यासाठीच मुंबईसह राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. विरोधी पक्षाने याची खात्री बाळगावी, अशा शब्दात शिवसेनेने विरोधकांवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’

पोलीस आयुक्तपदाची सूत्रे परमबीर सिंह parambir singh यांनी अत्यंत कठीण काळात हाती घेतली. करोना संकटाशी लढण्यासाठी त्यांनी पोलिसांत जोश निर्माण केला. धारावीसारख्या भागात ते स्वतः जात राहिले. सुशांत, कंगनासारख्या प्रकरणी त्यांनी पोलिसांचं धैर्य ढळू दिलं नाही. त्यामुळं पुढं या प्रकरणात CBI आली तरी मुंबई पोलिसांच्या तपासापुढं CBI ला जाता आलं नाही. TRP घोटाळ्याची फाईल त्यांच्याच काळात उघडली आहे. यामुळेच परमबीर सिह यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

 

हेही वाचा

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका

Health Benefits Of Banana Shake :आरोग्यासाठी केळी आणि दुधाचा ‘या’ पद्धतीनं करा वापर, याचे जबरदस्त फायदे करतील ‘हैराण’, जाणून घ्या

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?’ उर्मिला मातोंडकर यांची ‘त्या’ मुख्यमंत्र्यांवर टीका

आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘… पण काही जण वडिलोपार्जित संपत्ती वाढवण्याऐवजी ती विकून घरखर्च भागवतात’ – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार

Related Posts