IMPIMP

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

by Team Deccan Express
the government in maharashtra will collapse after may 2 says chandrakant patil

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर 2 मे रोजी निकाल घोषीत होणार आहे. हे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी आज (बुधवार) मंगळवेढा येथे केला. चंद्रकांत पाटील यांच्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सत्ताबदलावर मोठे वक्तव्य केले होते.

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल

पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे जेष्ठ नेते मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेत आहेत. प्रचार सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभांमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच आज चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी सत्ताबदलावर वक्तव्य करत विरोधकांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ आज मंगळवेढा शहरात गल्लोगल्ली जावून प्रचार केला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास व्यक्त करुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

हे सरकार फारकाळ टीकणार नाही
पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर पुन्हा एकदा भाष्य केले. हे सरकार पडणार आहे हे इयत्ता आठवीतील मुलगाही सांगू शकेल, असे विधान केले. तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असताना सरकार उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. सरकारकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने निर्णय प्रक्रिया थांबली आहे. अशा स्थितीत हे सरकार फारकाळ टीकणार नाही, असा दावा पाटील यांनी केला.

सरकारच्या पॅकेजवरुन चंद्रकांत पाटलांची टीका, म्हणाले -‘गरीब वर्गाला मदत केल्याचा आव आणला, केलेली मदत तुटपुंजी’

शरद पवारांनी स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख म्हणून जन्माला आले पण शरद पवार यांनी आपल्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री केले. वस्तुस्थिती अशी आहे की, उद्धव ठाकरे यांना अनेक गोष्टी माहितच नाहीत. स्वत: पीपीई किट घालून फिल्डवर उतरल्याशिवाय त्यांना प्रश्न कळणार नाहीत, अशी टीका चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी केली.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस ?
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करताना म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने अनेक गैरकारभार केले आहेत. यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी पंढरपूरच्या लोकांना पहिली संधी मिळाली आहे. पंढरपूरकरांनी भाजपच्या उमेदवाराला निवडून देऊन त्यांचा कार्यक्रम करावा, मी राज्यात त्यांचा करेक्ट कार्यक्रम करुन दाखवतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. आता चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी सरकारला सुरूंग लागणार असा दावा केला आहे.

Read More : 

नाना पटोले म्हणाले, ‘मोदी लोकांना म्हणताहेत मास्क घाला अन् स्वत: मात्र…’

फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’

 

महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, उत्तर प्रदेशाकडेही पहा; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावलं

 

पंढरपूरमध्ये बरसले पडळकर आणि दरेकर; म्हणाले – ‘आघाडी सरकार पांढर्‍या पायाचे, बलात्कारी’

 

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’

Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

 

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

 

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

 

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

 

चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’

Related Posts