IMPIMP

…म्हणून शरद पवारांनी मानले ठाकरे बंधूंचे आभार

by bali123
sharad pawar health issue uddhav thackeray raj thackeray pray for his recovery

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांची रविवारी सायंकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन दिली. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समोर येताच राज्यातील अनेक नेत्यांनी शरद पवार यांना फोनवरुन संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुक : राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे आभार मानले. शरद पवार sharad pawar यांची प्रकृती बिघडल्याचे समजल्यानंतर राजकीय तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आणि सदिच्छा व्यक्त केल्या.

‘पवार-शाह’ यांच्या भेटीवर संजय राऊतांचं Tweet ! म्हणाले – ‘मी ठामपणे सांगतो…’

प्रकृती बिघडल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि लता मंगेशकर यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना असल्याचे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार sharad pawar यांनी राज ठाकरे यांचे देखील ट्विटरवरुन आभार मानले आहेत.

‘पोलिस दलात पैसे खात नाही असा कर्मचारी, अधिकारी नाही’, जाणून घ्या नेमकं काय म्हणाल्या माजी DG मीरा बोरवणकर

लता मंगेशकर यांचे आभार
माझ्या प्रकृती अस्वस्थाची बातमी समजल्यानंतर आदरणीय लता मंगेशकर दीदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे, असे शदर पवार यांनी म्हटले आहे.

Also Read

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

 

शिवसेना खासदाराचा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोचक सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्राला खूप काम करायचं आहे, आरोपांचे रंग उधळू नका’


शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

 

होळी : रंगांचा सण आणि जातीवादाच्या विरूद्ध एका संताच्या संघर्षाची कथा?

 

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

 

जेव्हा स्टेजवर डान्स करू लागले भाजप आणि काँग्रेसचे टॉपचे 2 नेते, पाहा व्हिडीओ

 

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

 

West Bengal Assembly Elections : मिथुन चक्रवर्ती यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! PM मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जी विरोधात…

 

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

Related Posts